कटाची आमटी हा बहुदा पुरण पोळी बरोबर केला जाणारा पदार्थ, कारण आपण पुराणा साठी दाल शिजल्यावर निथलेल्या पाण्यालाच कट म्हणतात आणि त्याचीच कटाची आमटी बनवतात.पुर्वीच्या काळी सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त उपयोग केला जायचा,अन्नाची नासाडी पण अजिबात होत नसे. तर डाळीतुन निथळलेल पाणी सुद्धा वाया न जाऊ देता त्याची आमटी बनवली जात असे. तर अशी ही कटाची आमटी चवीला छान आणि करायला सोपी अशी आहे.
साहित्य
शिजलेल्या डाळीतुन निथळलेले पाणी(पुरण पोळीची रेसिपी पहा)
पुरण यंत्रात राहिलेले(न वाटले जाणारे)पुरण
१ टेबल स्पुन गुळ
१ टेबल स्पुन भाजलेले सुके खोबरे
१/४ टीस्पुन गोडां/काळा मसाला
१/२ टीस्पुन जिरे पुड
१/२ टीस्पुन जिरे पुड
१/४ टीस्पुन चिंच पेस्ट किंवा चिंचेचा कोळ(कोळ वापरलात तर १/४ टीस्पून पेक्षा जास्ती लागेल)
चवीनुसार मीठ
फोडणी साठी साहित्य
१ टीस्पुन तेल
१/४ टीस्पुन मोहरी
१/८ टीस्पुन जिरे
किंचित हिंग
चिमुटभर हळद
कढीपत्ता
कृती
प्रथम कट आणि पुरण चांगले एकत्र करून घ्या. एका भांड्यात तेल गरम करून फोडणी करा. फोडणीत कट घाला, आमटी खुप घट्ट असल्यास पाणी घालुन सैल कर. एक ऊकळी आल्यावर त्यात इतर साहित्य घालुन आमटी चांगली ऊकळावी. गरमा गरम कटाची आमटी तयार!
चिंच गुळ
Comments
Post a Comment