मला आणि माझ्या मुलांना अगदी मनापासुन आवडणारा गोडाचा शिरा करायला पण एकदम सोपा. गोडाचा शिरा फक्त सत्यनारायण च्या प्रसादा पुरता मर्यादित राहिलेला नसुन आजकाल सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या न्याहारी ला देखील केला जातो. फक्त एरवी केलेल्या गोडाच्या शिऱ्याला प्रसादा सारखी चव येतच नाही. चला तर मग सुरु करूया साहित्य आणि कृतीला.
साहित्य
१ कप बारीक रवा
१ कप साखर
१ १/2 कप दुध
१ कप पाणी
२-३ काजु तुकडे केलेले(ऐच्छीक)
२ वेलदोडयाची पुड
४ टेबल स्पुन तुप
बारीक चिमटी केशर(ऐच्छीक)
कृती
प्रथम रवा कोरडाच भाजुन घ्यावा(साधारण ५-७ मिनिटे). थोडा रंग बदलला की त्यात तुप घालावे, मग तुपावर मंद आचेवर चांगला खमंग(गुलाबी रंग होईस्तोवर) भाजुन घ्यावा.
रवा भाजत आला की त्यात काजुचे तुकडे घलवेत. रवा भाजेपर्यंत दुध आणि पाणी एकत्र करुन गरम करून घ्यावे. हे गरम केलेले दुध-पाणी भाजलेल्या रव्यात घालावे. झाकण ठेवुन एक वाफ आणावी . नंतर साखर घालुन व्यास्तीत ढवलावा .
पुन्हा झाकण ठेवुन ४-५ वेळा वाफ काढावी. साधारण मंद आचेवर १०-१२ मिनिटे शिजू द्यावा फक्त मध्ये मध्ये चमच्याने हलवावा. शिरा शिजल्यावर त्यात वेलची पुड आणि केशर घालावे. गरमागरम गोडाचा शिरा तयार!
Comments
Post a Comment