Thursday, October 24, 2013

डाळिंब्या/वालाची उसळ

डाळिंब्या, कडवे वाल, बिरडे  किंवा नुसतेच वाल ह्या विविध नावाने केली जाणारी ही उसळ खास मराठी पद्धत्तीची आहे. खास सणावारी केल्या जाणाऱ्या डाळिंब्या  खायला अतिशय रुचकर लागतात. तर नावाप्रमाणे ह्या वालाची चव थोडी कडसर असत, म्हणुनच ह्या उसळीला गुळ जास्ती लागतो. सर्वप्रथम १ कप वाल भिजत घालावेत, ह्या मापाचे साधारण ३ कप मोड येउन सोललेले वाल होतात. तर ह्या मोड आलेल्या वालाच्या २ पाककृती मी पोस्ट करणार आहे. पहिली पाककृती आहे डाळिंब्या किंवा वालाची उसळ, दुसरी आहे डाळिंबी भात. १ १/२ कप वालाची उसळ आणि १ १/२ कप वालाचा डाळिंबी भात. 

साहित्य (ह्या मापाच्या २ जणांसाठी डाळींब्या होतात)

१ १/२ कप मोड आलेले, सोललेले वाल 
२ टेबलस्पून तेल 
१/२ टीस्पून मोहरी 
१/८ टीस्पून हिंग 
१/८ टीस्पून हळद 
२ टेबलस्पून गुळ
चिरलेली कोथिंबीर 

कृती

प्रथम १ कप भरून वाल २४ तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते पाणी काढुन टाकुन चाळणीत वाल उपसत ठेवावे. पाणी पुर्णपणे निथळले की चाळणी ताटली ने झाकुन ठेवावी आणि वालाला मोड येऊ द्यावेत. मोड आलेले वाल १५ मिनिट गरम पाण्यात घालुन ठेवावेत म्हणजे ते सोलायला सोपे जातात.  वाल भिजत घालण्यापासून ते मोड येईपर्यंत साधारण ३ दिवस लागतात.

तर आता आपण ह्या वालाची उसळ करणार आहोत.
एका कढईत तेल गरम करा, आणि मोहरी, हिंग, हळद घालुन फोडणी करा, नंतर त्यात १ १/२ कप मोड आलेले, सोललेले वाल घाला. झाकण ठेवुन मध्यम आचेवर एक वाफ आणा. झाकणावर थोडं पाणी घाला आणि परत वाफ आणा.
मधे मधे झाकणावरचं पाणी उसळीत घाला. साधारण बोट चेप्या झाल्या की त्यात मीठ, तिखट, गुळ घाला आणि झाकणावर पाणी घालुन परत वाल व्यवस्तीत शिजेपर्यंत वाफ आणा. पण वाल अगदी लगदा होई पर्यंत शिजवु नका.
डाळिंब्या शिजल्या की चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम पोळी बरोबर वाढा.5 comments:

 1. nice.. i love this usal but its time consuming to make :). Where did you get vaal from?

  ReplyDelete
 2. This is my favorite usal too :) I got vaal from India.

  ReplyDelete
 3. खुपच सुंदर

  ReplyDelete
 4. खुपच सुंदर

  ReplyDelete
 5. Thank you for sharing your information.It was really good.Blending contemporary styling with the beauty , the United Elite Pressure Cookers, adds to the aesthetics of your kitchen with loads of features that include induction bottom for even distribution of heat.For details Click Here

  ReplyDelete