Monday, December 9, 2013

डाळींबी भात/वालाचा भात

डाळींबी भात बनवायची माझी ही पहिलीच वेळ होती. मी डाळींब्या खुप वेळा केल्या आहेत आणि त्याची रेसीपी मी ब्लोग वर टाकलीच आहे. ह्या वेळेस विचार आला कि वाल भीजत घातलेच आहेत तर थोडे जास्ती घालावेत आणि उसळी बरोबर डाळींबी भात पण करून बघावा. माझ्या मैत्रिणी कडे मी हा भात खालला होता खुप वर्ष आधी, तेव्हा पासुन डाळिंबी भात करून बघायची इच्छा होती. केल्यावर इतका अप्रतीम झाला आणि घरात ही सगळ्यांना आवडला. चला तर मग सुरु करूया डाळींबी भात.

साहित्य

१ १/२ कप मोड आलेले व सोललेले वाल
१ कप तांदुळ(स्वच्छ धुतलेले)
४ हिरव्या मिरच्या+४ लसुण पाकळ्या ठेचुन
१ १/२ टीस्पून गोडा मसाला
१ १/२ टीस्पून धने पुड
१ टीस्पून जिरे पुड
२ टेबलस्पून गुळ
३/४ कप नारळाचे दुध
१ १/४ कप पाणी
चवीनुसार मीठ
चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

फोडणीसाठी साहित्य 
२ टेबलस्पून तेल
कढीपत्ता
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हळद

कृती 
कुकर मध्ये तेल गरम करून फोडणी करा. फोडणीत मोड आलेले वाल, मिर्ची व लसणीचा ठेचा  घाला. एक वाफ आणा. नंतर त्यात तांदुळ घाला आणि परता. मग त्याचात धने-जीरे पुड, गोडा मसाला, मीठ, नारळाचे दुध आणि पाणी हे सर्व साहित्य घाला. एक उकळी आली की कुकरचे झाकण लावुन २ शिट्ट्या द्या आणि नंतर मंद आचेवर भात शिजू द्यावा. ५-७ मिनिटांनी आच बंद करावी. डाळींबी भात तयार!


तुपाबरोबर गरमागरम डाळींबी भात खुपच छान लागतो.


No comments:

Post a Comment