Wednesday, April 24, 2013

कैरीची डाळ/आंब्याची डाळ

चैत्र महिन्यात हळदी कुंकवाला केली जाणारी कैरीची डाळ आणि पन्ह याची चव न विसरण्यासारखी आहे.
देवीची आरास बनवतात आणि डाळ, पन्ह, आणि केलेला गोड पदार्थाचा नेवेद्य दाखवतात.

भारतात कच्च्या कैरीला चांगला आंबटपणा असतो पण अमेरिकेत मिळणाऱ्या कैरीला आंबटपणा खुपच कमी असतो त्यामुळे कैरीबरोबरच लिंबु देखील पिळायला लागते. ह्या डाळीला कुणी कैरीची डाल तर कुणी आंब्याची डाळ असही म्हणतात.

साहित्य 
१ कप चणा/हरबरा डाळ 
१ कप कैरीचा कीस 
२-३ हिरव्या मिरच्या(वाटुन घ्या)
मीठ चवीप्रमाणे 
१ टीस्पून साखर 
२ टेबलस्पुन बारीक चिरलेली कोथिंबीर 
लिंबाचा रस चवीप्रमाणे(कैरी आंबट नसल्यास लिंबू रस लागेल)
फोडणीसाठी साहित्य 
३ टेबलस्पुन तेल 
चिमुटभर हिंग 
१/२ टीस्पुन मोहरी 
१/४ टीस्पुन हळद 

कृती 
प्रथम कढल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद घालुन फोडणी करावी. फोडणी संपुर्ण गार होऊ द्यावी. 
चण्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावी व दुसऱ्या दिवशी सर्व पाणी काढून टाकावे. मिक्सर मध्ये किंवा फुड प्रोसेसर मध्ये भरड वाटुन घ्यावी. वाटलेल्या डाळीत मीठ, साखर, मिरच्यांचा ठेचा, लिंबाचा रस(वापरत असल्यास, साधारण एका लिंबाचा रस लागेल . चवीप्रमाणे कमी जास्ती वापरावा), कैरीचा कीस, कोथिंबीर व  गार झालेली फोडणी घालावी आणि एकत्र करावे. चव घेऊन बघा, डाळीला आंबट चव आली पाहिजे. आता चवीप्रमाणे मीठ, आंबट, तिखट वाढवू शकता.



Sunday, April 14, 2013

गोडाचा शिरा


सर्वांना गुढीपा२ डव्याच हार्दिक शुभेच्छा! खरं तर मला उशीरच झाला शुभेच्छा द्यायला पण सध्या नियमित पणे ब्लॉग वर लीहायला वेळच मिळत नाही. असो तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने आमच्या घरी गोडाचा शिरा झाला. भारतात तर गुढीपाडव्याची मजा काही औरच असते. सकाळी सकाळी गुढी उभारणं मग पुजा करुन देवाला गोडाचा नेवेद्य दाखवणं आणी मग सगळ्यांबरोबर गोडाचं जेवण करण, असा सागर  संगीत हा सण साजरा व्हायचा. 

मला आणि माझ्या मुलांना अगदी मनापासुन आवडणारा गोडाचा शिरा करायला पण एकदम सोपा. गोडाचा शिरा फक्त सत्यनारायण च्या   प्रसादा पुरता मर्यादित राहिलेला नसुन आजकाल सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या न्याहारी ला देखील केला जातो. फक्त एरवी केलेल्या गोडाच्या शिऱ्याला प्रसादा सारखी चव येतच नाही. चला तर मग सुरु करूया साहित्य आणि कृतीला. 

साहित्य 
१ कप बारीक रवा 
१ कप साखर 
१ १/2  कप दुध 
१ कप पाणी 
२-३ काजु तुकडे केलेले(ऐच्छीक)
२ वेलदोडयाची पुड 
४ टेबल स्पुन तुप 
बारीक चिमटी केशर(ऐच्छीक)

कृती 
प्रथम रवा कोरडाच भाजुन  घ्यावा(साधारण ५-७ मिनिटे). थोडा रंग बदलला की त्यात तुप घालावे, मग तुपावर  मंद आचेवर चांगला खमंग(गुलाबी रंग होईस्तोवर) भाजुन घ्यावा.

 रवा भाजत आला की त्यात काजुचे तुकडे घलवेत.   रवा भाजेपर्यंत दुध आणि पाणी एकत्र करुन गरम करून घ्यावे. हे गरम केलेले दुध-पाणी भाजलेल्या रव्यात घालावे. झाकण ठेवुन एक वाफ आणावी . नंतर साखर घालुन व्यास्तीत ढवलावा .

 पुन्हा झाकण ठेवुन ४-५ वेळा वाफ काढावी. साधारण मंद आचेवर १०-१२ मिनिटे शिजू द्यावा फक्त मध्ये मध्ये चमच्याने हलवावा.  शिरा शिजल्यावर त्यात वेलची पुड आणि केशर घालावे. गरमागरम गोडाचा शिरा तयार!




Friday, April 5, 2013

कटाची आमटी

कटाची आमटी हा बहुदा पुरण पोळी बरोबर केला जाणारा पदार्थ, कारण आपण पुराणा साठी दाल शिजल्यावर निथलेल्या पाण्यालाच कट म्हणतात आणि त्याचीच कटाची आमटी बनवतात.पुर्वीच्या काळी सगळ्या गोष्टींचा जास्तीत जास्त उपयोग केला जायचा,अन्नाची नासाडी पण अजिबात होत नसे. तर डाळीतुन निथळलेल पाणी सुद्धा वाया न जाऊ देता त्याची आमटी बनवली जात असे. तर अशी ही कटाची आमटी चवीला छान आणि करायला सोपी अशी आहे. 

साहित्य
शिजलेल्या डाळीतुन निथळलेले पाणी(पुरण पोळीची रेसिपी पहा)
पुरण यंत्रात राहिलेले(न वाटले जाणारे)पुरण 
१ टेबल स्पुन गुळ 
१ टेबल स्पुन भाजलेले सुके खोबरे 
१/४ टीस्पुन गोडां/काळा मसाला
१/२ टीस्पुन जिरे पुड 
१/४ टीस्पुन चिंच पेस्ट किंवा चिंचेचा कोळ(कोळ वापरलात तर १/४ टीस्पून पेक्षा जास्ती लागेल)
चवीनुसार मीठ 
फोडणी साठी साहित्य 
१ टीस्पुन तेल 
१/४ टीस्पुन मोहरी 
१/८ टीस्पुन जिरे 
किंचित हिंग 
चिमुटभर हळद 
कढीपत्ता 

कृती 
प्रथम कट आणि पुरण चांगले एकत्र करून घ्या. एका भांड्यात तेल गरम करून फोडणी करा. फोडणीत कट घाला, आमटी खुप घट्ट असल्यास पाणी घालुन सैल कर. एक ऊकळी  आल्यावर त्यात  इतर साहित्य घालुन आमटी चांगली ऊकळावी. गरमा गरम कटाची आमटी तयार!


चिंच गुळ 

पुरण पोळी

होळी रे होळी पुरणाची पोळी! होळी हा सण येतो फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यत. वसंत ऋतुची सुर्वात होळी सारख्या रंगीत सणानी होते. तसेच होळी आली कि पुरण पोळी आलीच पहिजे. महाराष्ट्रात केली प्रसिद्ध असलेली पुरणाची पोळी केली जाते चण्याचा दलिचि. आता काही जण गुळ घालुन पुरण बनवतात तर काही जन साखरेची करतत. मला लहान पणापासून गुळाची पोळी खायची सवय आहे कारण माझी आई गुळाची बनव्ते. गुळामुळे पोळी ला एक प्रकारचा खमंग पणा येतो. इतर खास मराठी पदार्था सारखेच पुरण पोळी सुधा मी माझा आई कडून शिक्ले. माझी आई अप्रतीम पुरण पोळ्या बनवते.
पुरण पोळी बरोबर कटाची आमटी बनवली जाते, त्याची पाककृती पण मी दुसर्या पोस्ट मधे देणार आहे. चला तर आधी सुरवात करूया पुरण पोळी ने.

पुरणासाठी लागणारे साहित्य 
२ १/२ कप चाणा डाळ
२ १/२ कप चिरलेला गुळ
१/२ कप साखर
१ टीस्पून जायफळाची पूड

कणकेसाठी लागणारे साहित्य 
२ १/२ कप कणिक
१/२ कप  मैदा
१/३ कप तेल (२ टेबल स्पून + १/४ कप + १ टेबल स्पून)
कणभर मीठ
लागेल तसं पाणी कणिक भिजवायला

लागेल तशी तांदुळ पिठी पोळ्या लाटायला 
पुरण यंत्र 
सपीठाची(बारीक) चाळणी कणिक चाळायला 

पुरणाची कृती
प्रथम चणा डाळ बोटाच्या  पहिल्या पेरा पर्यंत येईल एवढ्या पाण्यात कूकर मध्ये शिजवुन घ्य. ३-४ शिट्ट्या देऊन गॅस  बारीक करून थोडा वेळ ठेवा. शिट्टी पडल्यावर डाळ काढून चाळणीवर निथळत ठेवा. निथळलेले पाणी(ह्यालाच कट म्हणतात) एका डब्यात भरून ठेवा, हे पाणी आपण कटाच्या आमटी करता वापरु शकतो .

आता डाळीत, चिरलेला गुळ आणि साखर घाला. हे सर्व मिश्रण एका मायक्रोवेव चा भांड्यात घाला.

 मायक्रोवेव मध्ये पुरण शिजवुन घ्या. साधारण १५ ते १७ मिनिटे लागतात. ४ मिनिटे आधी ठेवा,  दर ४-५ मिनिटांनी पुरण चमच्याने हलवुन घ्या. पुरणात चमचा व्यवस्तीत उभा राहिला की  पुरण झाले असे समजावे.

,

पुरण तयार झाल्यावर त्याच्यात जायफळाची पुड घाला. नंतर हे पुरण, पुरण यंत्रातुन काढुन घ्यावे. पुरण यंत्रात शेवटचे राहिलेले पुरण काढून कटा बरोबर एकत्र करून बाजुला ठेवुन  द्या. हे तयार झाले तुमचे पुरण.



कणकेची कृती 
चाळणीने कणिक चाळून घ्यावी. चाळणी वर राहिलेला कोंडा टाकुन द्यावा. त्याच चाळणीत मैदा देखील चाळून घ्यावा. नंतर कणकेत मीठ घाला आणि २ टेबल स्पून तेल घाला, थोडं थोडं  पाणी घालुन  कणिक अगदी सैलसर भिजवावी. आता १/४ कप तेल घालुन कणिक चांगली मळावी . कणिक एकदम सैल असली पहिजे. कणिक मळुन  झाल्यावर बोटाने कणकेवर खळगे बनवा आणि त्याचात साधारण १ ते २ टेबल स्पून तेल  घाला . झाकण ठेवुन कणिक १ तास बाजुला ठेवुन घ्या.

पुर्यांसाठी घेतो त्या पेक्षा थोडी  जास्ती कणिक घ्यावी आणि त्या गोळीच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्या.


 हातानी कणकेचा गोळा थोडा चापट करून ह्या गोळीत पुरण भरावे आणि एक मोठा गोळा तयार करावा . हातानी दाबून हा गोळा चपटा करा व तांदुळाच्या पिठीत घोळून घ्या. आता पोळपाटावर तांदुळ पिठी भुरभुरून टाका. अगदी सैल हातानी कणकेचा पुरण भरलेला गोळा घेऊन अलगद लाटा. लाटताना मध्ये मध्ये पोळपाट हलवावा म्हणजे पोळी चिकटत नाही. आता लाटण्यावर अलगद गुंडाळुन पोळी गरम तव्यावर टाका आणि दोन्ही बाजूने छान भाजुन घ्या.
                                                                                                         


 हीच कृती उरलेल्या पोळ्या करायला वापरा . ह्या मापाचा साधारण १७ मोठ्या आकाराच्या पोळ्या होतात. पोळी गार झाल्यावर भरपुर तुप घालुन खावी. खास बटाटा भाजी आणि कटाची आमटी बरोबर पुरण पोळीची मजा काही औरच असते.